Aumkar Sanskar Kendra - Shree Ganapati Atharvasheersha - पाणिनीय / परसवर्ण पध्दती
Mind megjelölése nem lejátszottként
Sorozat kép•Feed
Manage series 2997133
A tartalmat a Asmita Sharad Dev biztosítja. Az összes podcast-tartalmat, beleértve az epizódokat, grafikákat és podcast-leírásokat, közvetlenül a Asmita Sharad Dev vagy a podcast platform partnere tölti fel és biztosítja. Ha úgy gondolja, hogy valaki az Ön engedélye nélkül használja fel a szerzői joggal védett művét, kövesse az itt leírt folyamatot https://hu.player.fm/legal.
Aumkar Sanskar Kendra - Shree Ganapati Atharvasheersha - पाणिनीय / परसवर्ण पध्दती ==== नमस्कार 🙏 मी श्रीमती अस्मिता शरद देव, ॐकार संस्कार केंद्राची संस्थापिका आणि संचालिका. १९९८ मध्ये स्थापन झालेल्या ह्या केंद्रात संपूर्ण स्वास्थ्यासाठी ॐकार उपासना, बाल संस्कार वर्ग, पाणिनीय / परसवर्ण पध्दतीने श्रीगणपति अथर्वशीर्ष पठण वर्ग, श्रीसूक्त पठण वर्ग, श्री लक्ष्मीमातेचे संक्षिप्त पूजन इत्यादि वर्ग घेतले जातात. गेल्या १५ महिन्यात कोरोनाच्या संकटामुळे आम्ही हे सर्व वर्ग गुगल मीटद्वारा ॲानलाइन घेतो. ह्या वर्गांना महाराष्ट्रातील कानाकोप-यातून, आंध्र प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश; तसेच अमेरिका, हॅांगकॅांग, दुबई, आयर्लंड इत्यादि ठिकाणचे लोक सहभागी होतात. ==== We have students / participants from India 🇮🇳 Mumbai, Thane, Pune, Aurangabad, Nasik, Indore, Gurudaspur, Ahmednagar, Dhule, Nagpur, Hyderabad, Bengaluru, Vijaypura, Jalgaon, Ratnagiri, Surat, Baroda and many cities / towns International Dubai UAE 🇦🇪, Oman 🇴🇲, USA 🇺🇸, Hong Kong 🇭🇰, United Kingdom 🇬🇧, Ireland 🇮🇪, Qatar 🇶🇦 ==== 🙏 नमस्कार मंडळी 🙏 संस्कृत उच्चार स्वच्छ व शुध्द केल्याने आपले शारिरिक, मानसिक, बौध्दिक, भावनिक, वैचारिक आणि आत्मिक आरोग्य चांगले राखले जाते. आता आपण पाहू या हे उच्चार कसे करायचे ते. हे शिकण्याचे उत्तम साधन म्हणजे श्री गणपति अथर्वशीर्ष. ह्यामधे जवळजवळ सगळ्या मातृका म्हणजे संस्कृतमधले स्वर, व्यंजने आणि विशेष करून अनुस्वार (ं) आणि विसर्ग (:) हे स्वर खूप जागी येतात. आपण प्रत्येक अनुस्वाराचा उच्चार म् करतो आणि प्रत्येक विसर्गाचा उच्चार ह करतो ही चुकीची गोष्ट आहे. संस्कृत उच्चार पध्दतीची उदाहरणांसहित नियमावली मी माझ्या *श्री अथर्वशीर्ष पठण* ह्या कोर्समधे देतेच. आत्ता मी ह्या व्हीडिओत अथर्वशीर्षच अशा प्रकारे म्हणणार आहे की ज्यात ह्या नियमांचं पालन केलं जाईल. ह्या पध्दतीला म्हणतात परसवर्ण किंवा पाणिनीय उच्चार पध्दति. ही पध्दति फक्त उच्चार करतानाच वापरायची बरं का, लिहिताना नाही.
…
continue reading
9 epizódok